Mahabharat

कर्ण – महापुरुष की खलपुरुष? Karn-Mahapurush Ki Khalpurush

कर्ण – महापुरुष की खलपुरुष? Karn-Mahapurush Ki Khalpurush

Rs 450

कर्ण म्हणजे महाभारत कथेतील एक भारदस्त व तितकेच वादग्रस्त पात्र. मृत्युंजय, कौंतेय सारख्या कादंबऱ्यांनी कर्णाला एक उदात्ततेचे वलय मिळवून दिले. शोषितांचा प्रतिनिधी म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं व म्हणूनच कर्णाचा विषय निघताच सर्वसामान्य वाचक भावुक होतो. मृत्युंजयातील कर्ण हाच त्याला खरा महाभारतातील कर्ण वाटू लागतो. पण वस्तुस्थिती तशी आहे काय? आणि हे समजणार कसे? मूळ महाभारतातील कर्ण समोर येणार कसा ? इतर बऱ्याच पुस्तकांमध्ये तो, एक प्रकरण म्हणून उलगडलेला आहे. पण दाजी पणशीकरांनी “कर्ण खरा कोण होता?” या पुस्तकाद्वारे कर्णाची एक वेगळीच बाजू समोर आणली. त्याचप्रमाणे सौ माधुरी सप्रे यांचे “कर्ण - महापुरुष की खलपुरुष?” हे पुस्तक देखील कर्णाचा असाच तौलनिक अभ्यास करून, कर्णाला उलगडून महाभारतातील त्याची प्रतिमा आपल्यासमोर उभी करतात.

More info →
महाभारत – संघर्ष आणि समन्वय – रवींद्र गोडबोले

महाभारत – संघर्ष आणि समन्वय – रवींद्र गोडबोले

Rs 600/-

एकूण १० प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकाची सुरुवात “महाभारत का उद्भवले?” या प्रश्नापासूनच होते. “पांडवांचा राज्यावर हक्क होता का?”, “राजा कोण हे ठरविण्याचा अधिकार कोणा कोणाला होता?”, या प्रसंगी सत्यवती व भीष्म यांचे वागणे, पुढे दुर्योधनाचे व धृतराष्ट्राचे वागणे, यातील बारकावे आपल्याला उलगडत जातात. 

More info →
महाभारतातील स्त्रिया भाग – १ – डॉ. आ. ह. साळुंखे

महाभारतातील स्त्रिया भाग – १ – डॉ. आ. ह. साळुंखे

eBook: Rs. 100

महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी  एक  मुळी द्रौपदीच्या  अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना स्वतःचे तेज , ठोस विचारसरणी , ओजस्विता आहे, व त्यामुळे महाभारतातील काही स्त्रियांची रेखाटने उठून दिसतात.

महाभारतातील उपाख्यानांमध्येही काही जनमानसात रूढ झालेल्या तर काही तुलनेने अप्रसिद्ध कथानकांद्वारे आपल्याला विविध स्त्रियांची ओळख होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी “महाभारतातील स्त्रिया - भाग १” या पुस्तकातून यातील काही निवडक स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हि ओळख केवळ त्या स्त्रीच्या स्वभावाची अथवा महाभारतातील स्त्रीच्या संदर्भातील नसून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या शब्दचित्रामधून रेखाटले आहे.  महाभारतात येणारी एखादी कथा काय आशय दर्शविते व त्यातून स्त्री चे अथवा समाजमनाचे कोणते रूप आपण लक्षात घ्यावे याचे उत्तम विश्लेषण डॉ साळुंखे करतात.

 

More info →
महाभारत एक मुक्त चिंतन  – प्रेमा कंटक

महाभारत एक मुक्त चिंतन – प्रेमा कंटक

महाभारतातील विविध प्रसंगाचे विवेचन , त्याची चिकित्सा व त्यामागील शक्याशक्यता इत्यादींचे विवेचन सुमारे ५५ - ६० वर्षांपूर्वी महाभारताची भांडारकरप्रणित चिकित्सक  प्रत उपलब्ध झाल्यावर अनेकांनी केले आहे. यातील बरेच साहित्य त्या काळात पुस्तक रूपात उपलब्ध होत होते. पण हि पुस्तके आता दुर्मिळ या सदरात गणली जाऊ लागली आहेत. लेखिका प्रेम कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन , हे देखील याच दुर्मिळ प्रकारातील एक वेगळे पुस्तक. महाभारताचे वेगळ्या अंगानी चिंतन करत परामर्श घेणारे. तत्कालीन इतरांनी लक्षात न घेतलेले दुवे, संकल्पना मांडणारे व त्याचे वर्गीकरण करत महाभारताची कथा उलगडून दाखविणारे. या पुस्तकाला विनोबाजींनी प्रस्तावना देखील आहे. 

More info →
महाभारतातील व्यक्तिरेखा – डॉ विमल पवनीकर

महाभारतातील व्यक्तिरेखा – डॉ विमल पवनीकर

Rs 500

महाभारतातील विविध व्यक्तिरेखांवर आजवर बरेच व्यक्तिचित्रण केले गेले आहे. व्यासांच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील या व्यक्तिरेखांना इतक्या छटा आहेत कि यातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव विशेष, गुवणत्ता व पराक्रम दाखविणारी स्वतंत्र पुस्तके देखील उपलब्ध आहेत. “महाभारतातील व्यक्तिरेखा” हे डॉ विमल पवनीकरांचे पुस्तक म्हणजे यातील १७ व्यक्तिरेखांचे वर्णन करणारे, नागपूरच्या तरुण भारत मध्ये ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरचे लेख वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. उदा. कर्ण हि व्यक्तिरेखा वैकर्तन कर्ण, सूतपुत्र कर्ण, शापग्रस्त कर्ण , अधःपतित कर्ण, पराजित कर्ण, अनिर्वचनीय कर्ण व रणवीर कर्ण अश्या विविधांगाने आपल्यासमोर येतो व याचप्रमाणे इतर व्यक्तिरेखादेखील. 

 

More info →
स्वयंभू – डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

स्वयंभू – डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

Rs 288eBook: Rs 200

१९७१ साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी १९८८ साली तिसरी आवृत्ती काढताना एक महत्वाची भर घातली ती म्हणजे महाभारत युद्धाचा कालखंड ठरविण्याची. महाभारतातील विविध पर्वांत आलेल्या खगोलशास्त्रीय श्लोकांचा आधार घेत त्यांनी महाभारत युद्ध इ. स. पूर्व ५५६१ साली झाले असे प्रतिपादिले आणि एका वेगळ्या चर्चेला देखील तोंड फोडले. त्यांचे हेच वर्ष प्रमाण मानत  डॉ. निलेश ओक यांनी पुढे त्याचा वेगळा अभ्यास केला व स्वतःचे वेगळे संदर्भ देत १६ ऑक्टो. ५५६१ हि युद्धाच्या पहिल्या दिवसाची तारीख असल्याचे जाहीर केले. 

भीम स्वयंभूच होता हे प्रतिपादताना श्री वर्तक यांनी भीमाची पुराणकथाकारानी व कीर्तनकारांनी रंगविलेली आडदांड , खादाड, अविचारी,शीघ्रकोपी, व पटकन भावनाविवश होऊन निर्णय घेणारा पांडव, अशी प्रतिमा कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी भीमाबद्दलची महाभारतातील प्रतिमा २ भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग हा भीम हा एक उपेक्षित पण विद्वान मुत्सद्दी असल्याचे पटविणारा तर दुसरा भाग भीम कसा मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक होता हे दर्शविणारा. आणि या दोन्ही प्रकारातून त्याच्या अजोड बुद्धिमत्तेने आणि अतुलनीय पराक्रमामुळे भीम महाभारताचा नायक कसा ठरतो हे वाचकांना पटविण्यात श्री प वि वर्तक यशस्वी झाले आहेत.

More info →
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे – विश्वास दांडेकर

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे – विश्वास दांडेकर

Rs. 200

मला कृष्ण कुठे सापडेल? हा मला बरेच दिवस पडलेला प्रश्न होता.  खराखुरा कृष्ण, देवपणाची पुटे  न चढलेला कृष्ण, राजकारण धुरंधर कृष्ण, महाभारतातील पांडव सखा, अर्जुनाचा सखा. असा कृष्ण मला तुकड्या-तुकड्यामध्ये व्यासांचे शिल्प, युगांत, व्यासपर्व मध्ये सापडत होता, पण त्यात हवी तशी सलगता नव्हती.  "युगंधर" मधला भगवान श्रीकृष्ण सुखावणारा असला तरी सर्वस्वी पटणारा नव्हता.  त्यामुळेच ज्या कृष्णाला मी शोधत होतो तो थोड्याफार प्रमाणात मला सापडला तो श्री विश्वास दांडेकर यांच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये.

महाभारताच्या कथानकावर बेतलेले हे पुस्तक आपल्याला महाभारताला स्पर्श करत कृष्णचरित्र उलगडताना आढळते.  कृष्ण जन्मापूर्वीची गोकुळ व मथुरेतील यादवांची स्थिती,  गणराज्य व राजेशाही यातील सूक्ष्म फरक, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कंस जरासंध द्वयीच्या राजेशाहीची स्थापना, याने या पुस्तकाची सुरुवात होते.  आणि आपल्याला कृष्णजन्म व त्यानंतर काय काय व कसे कसे घडले याची माहिती देते.  मग अशाच प्रकारे आपल्या पुढे येतो तो कुरु वंशाचा संक्षिप्त इतिहास आणि त्यांच्यातील दुहीच्या बीजांची कारणे.  छोट्या-मोठ्या घटनांचा उल्लेख करत पण त्यातील वर्णने टाळत आपल्याला मग पांडव व कृष्ण कसे व का एकत्र आले हे अगदी सहजपणे उकलते.

त्यानंतरच्या घटना या कृष्णाच्या पांडवांबरोबरच मैत्री नंतरच्या आहेत.  ज्या सुरू होतात द्रौपदीस्वयंवराबरोबर जेथे कृष्ण प्रथम महाभारतात येतो.  त्याआधीच्या घटना हरिवंश अथवा भागवत पुराणातून आपल्या समोर येतात.  कृष्ण पांडवांबरोबर आल्यानंतर राज्य वाटणी, खांडववन दहन, इंद्रप्रस्था ची स्थापना, जरासंध वध, राजसूय यज्ञ व यावेळी कृष्णाने केलेला शिशुपालवध या सार्‍या घटनांची कारणमीमांसा आपल्याला सहज उलगडत जाते.

मग येतो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग दोन विस्तृत प्रकरणातून आपल्याला या प्रसंगाच्या वेळी ते द्यूत  का व कसे घडले असावे? आणि वस्त्रहरण हि घटना प्रत्यक्षात का घडलेली नसावी ? हे समजावून दिले आहे. यात द्यूत, अक्षविद्या आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, या सार्‍यांची फोड आहे व तसेच वस्त्रहरण प्रसंगात पर्यंतच्या व नंतरच्या घटना उकलून दाखविलेल्या  आहेत

यानंतरचा कृष्ण येतो तो शिष्टाई प्रसंगीचा. या प्रसंगात श्रीकृष्णाच्या कौशल्याची कसोटी लागते व त्यात तो स्वतःच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था स्वतःच  करत, दुर्योधन, दुशासन, कर्ण व शकुनी या चौकडीचा धुव्वा उडवत, युद्धाचा सर्व दोष कौरवांवर टाकत,  आपल्या मनाप्रमाणे युद्ध ठरवतो व कृष्णशिष्टाई फिस्कटली, असे दाखवत नंतर कर्णाला  त्याचं जन्म रहस्य उघड करत, त्यावर मानसिक आघात देखील करतो.

याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये या साऱ्या घटनांची सांस्कृतिक पार्श्वभूमी व संदर्भ आहेत जे या पुस्तकाला परिपूर्ण करतात.  व म्हणूनच तुम्हाला जर महाभारत कथेची जाण असेल व महाभारतातल्या कृष्णाचा परिचय करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.  अर्थातच या एकाच पुस्तकात सामावण्या एवढा कृष्ण लहान नाही.  त्याला आणखी शोधायचा असेल तर तो हरीवंश, भागवत पुराण,बाळशास्त्री हरदास यांची व्याख्याने, अशा विविध ठिकाणी शोधायला हवा तेव्हा त्याचे विखुरलेले वेगवेगळे अंश सापडतील.

More info →
Buy from Amazon
महाभारत एक सूडाचा प्रवास – दाजी पणशीकर

महाभारत एक सूडाचा प्रवास – दाजी पणशीकर

Rs 450

महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं.  कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, कर्ण, दुर्योधन, अर्जुन यांसारखे अनेक महानायक पण तयार केले.  महाभारताचा विविध अंगाने अर्थ लावायचा प्रयत्न विविध लेखकांनी केला.  दाजी पणशीकर यांचा या पुस्तकातील प्रयत्न हा असाच एक “सूड” हि  वेगळी मध्यवर्ती संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न होता व तो कमालीचा यशस्वी झालाय.

 

१९७७ साली  प्रथम प्रसिद्ध झालेल्या महाभारत - एक सूडाचा प्रवास, या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची विस्तृत प्रस्तावना आहे.  हीच प्रस्तावना पुढे "व्यासांचे शिल्प" या नरहर कुरुंदकरांच्या लेखांचं / प्रस्तावनांचे संकलन असलेल्या पुस्तकात देखील संकलित केली आहे.

महाभारत घडण्यास कारण ठरलेल्या क्रोधातून जन्मलेल्या सूड या संकल्पनेभोवती  या पुस्तकाचा विषय उलगडला जातो.  याची सुरुवात होते ते परशुरामांचा क्रोध व सूड  उलगडून.  आणि महाभारताची सुरुवात पणशीकर यांच्या मते होते ते अंबेच्या प्रतिशोधाच्या धुमसणाऱ्या आगीतून. काशीराजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन कन्यांच्या स्वयंवरासाठी भीष्म पोहोचतात ते राजकुमार विचित्रविर्यासाठी.  आणि या पळवून आणलेल्या मुलींपैकी अंबा जेव्हा आपले शाल्व  राजावर प्रेम असल्याचे हस्तिनापुरात त्यांना सांगते, तेव्हा ते तिला सन्मानाने शाल्वाकडे परत देखील पाठवतात.  पण दुसऱ्याने पळवलेली मुलगी, म्हणून शाल्व तिला स्वीकारायला नकार देतो.  प्रतिज्ञाबद्ध भीष्मही  तिला स्वीकारत नाहीत आणि मग संतप्त अंबा याचा सूड म्हणून भीष्मांच्या विनाशासाठी विविध उपाय योजते.  अगदी परशुरामांना ही भरीस  घालते पण शेवटी तिचा निरुपाय होतो आणि ती अग्नीसमर्पण करते तेच भीष्मनाशासाठी पुनर्जन्म घेण्याच्या इच्छेने.  सुडाची ही साखळी व्यवस्थितपणे मांडण्यासाठी पणशीकरांनी या पुस्तकातील आठ प्रकरणे वापरली आहेत. 

 

द्रुपद व द्रोण यांच्यातील कटुतेचा उद्रेक हि सुडाची अजून एक साखळी.  द्रुपदाला बालमित्र म्हणून भेटायला गेलेल्या द्रोणाचा, राजा द्रुपद अपमान करतो, आणि द्रोण मग सूडाच्या भावनेने पेटून उठतात.  त्यांच्या पुढच्या सर्व क्रिया, त्यांचे कुरू दरबारात जाणे,  राजपुत्रांना शिकवणे, त्यांच्याकडून द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागणे, हे  सारे काही द्रुपदाचा सुड घेण्यासाठी.  आणि तो घेतला गेल्यावर द्रुपद सुडाने पेटून उठतो तो द्रोणांना संपविण्यासाठी  आणि मग दुसरे सूडचक्र सुरू करतो.  ते मग दृष्टद्युम्न,  द्रौपदी यांना जन्माला घालण्यापासून ते अंतिम युद्धात द्रोणाचा शिरच्छेद दृष्टद्युम्न करेपर्यंत संपतच नाही.  आणि यामध्येही अनेक लहान मोठी सूडचक्र सुरूच राहतात.  द्रौपदी स्वयंवर प्रसंगी कर्णाचा अपमान करते याचा प्रतिशोध कर्ण घेत राहतो, प्रत्येक वेळी तिला अपमानित करण्याची संधी शोधत.  दुर्योधनाला त्याची साथ मिळत जाते आणि त्यातून निर्माण होणारे  सूडचक्र तर सर्वांनाच गिळंकृत करते.  यातच मध्ये जन्मांधांच्या अंधारयात्रेचे चक्र आहे आणि डोळस गांधारीचे देखील.

महाभारत युद्धाचा अंत देखील सूडचक्रामुळेच करुण झाला आहे.  आपल्या पित्याच्या हत्येने सूडाग्नी प्रज्वलित झालेला अश्वत्थामा, युद्ध संपल्यानंतर पांचालांच्या शिबिरात निद्रिस्त असलेल्या पांचाल सेनापती दृष्टद्युम्न, द्रौपदीची पाच मुले, शिखंडी इत्यादींची रात्री अमानुष हत्या करतो आणि या सूड  चक्राची पुढची पायरी गाठतो.

अशा या संहार पर्वाचे वर्णन दाजी पणशीकरांनी व्यवस्थित उलगडून दाखवले आहे व ते देखील विविध श्लोकांचे प्रमाण देत, आणि त्यांचा अर्थ विशद करीत.  त्यामुळेच महाभारत कथानकातील बारीक-सारीक पैलू देखील एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर उघड होतात. पणशीकरांचा महाभारताचा अभ्यास, त्यांचे त्यावरील चिंतन, आणि विषय समजावण्याची हातोटी केवळ अप्रतिम आहे व म्हणूनच महाभारताचे सूड हे अंग समजावून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते.

More info →
Buy from Amazon
व्यासांचा वारसा – आनंद विनायक जातेगावकर

व्यासांचा वारसा – आनंद विनायक जातेगावकर

Rs 279

ज्या गोष्टी महाभारतातून भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीलाही वेगळ्या करता येऊ शकल्या नाहीत (कोणत्या ना कोणत्या तरी जुन्या हस्तलिखित प्रतींमध्ये असल्यामुळे) त्या  देखील या आरश्यात आपल्याला स्पष्टपणे ओळखता येऊ शकतात.  मात्र यासाठी हा आरसा पाहण्याचे कसब आत्मसात करणे, आपल्याला  आवश्यक आहे.

जातेगावकऱ्रांचं एक निरीक्षण म्हणजे, स्वतः कथालेखक असलेले व्यास जे या कथेचा भाग आहेत, ते निर्वाणीच्या क्षणी या कथेत स्वतः हजर होतात, ते मोलाचा सल्ला देतात, सूचक बोलतात, मात्र कोणतीही भविष्यवाणी ते वर्तवित नाहीत.  ते दैववादी नाहीतच मुळी आणि यात कृष्ण सोडला,  तर इतर सर्व व्यक्तिरेखा मात्र,  दैववादाचा समर्थन करताना आढळतात व त्यातून वर, शाप, चमत्कार या संकल्पना उगम पावतात.  व्यास मात्र कोठेही यात  अडकत नाहीत.  जातेगावकर यातून हेदेखील सूचित करतात की,  या साऱ्या गोष्टी म्हणजे उत्तरकालीन भर.  व्यासांनी स्वतः कुठेही अशा प्रकारची वाक्ये टाकलेली नाहीत.

 

महाभारतातील काही घटना प्रक्षेप कशा असतील हे आपल्याला जातेगावकर सुचवून जातात.  शरशय्येवर पडलेल्या भीष्मांनी,  युधिष्ठिराला केलेला उपदेश हा याच प्रकारातला.  राजाचं,  संसारी गृहस्थाचे वर्तन कसं असावं याबद्दल भीष्मांनी लावलेले पाल्हाळ पाहता हे अगदी पटते.  तीच गोष्ट वनपर्वातील सत्यभामा-द्रौपदी संवादाची.  उत्तरकालीन पुरुषी प्रवृत्तीला स्त्री वर्गाकडून / पत्नी वर्गाकडून, अपेक्षित असणाऱ्या साऱ्या गोष्टी द्रौपदी द्वारे वदविल्या गेल्या आहेत, हे पटवून देण्यात जोतेगावकर यशस्वी होतात.

तीच गोष्ट युधिष्ठिर यक्ष संवादाची.  ब्राह्मणी वर्चस्वाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी यक्ष युधिष्ठिर कडून वदवून घेतो व चक्क तळ्याकाठी मृत होऊन पडलेल्या पांडवांना जिवंत करतो.  भांडारकर संस्थेच्या श्री विष्णू सुखटणकर यांनी मांडलेल्या भृगू सिद्धांताचे हे आणखी एक उदाहरण.

काही गोष्टींची उत्तरं जातेगावकर त्यांच्या प्रतीप्रश्नांनी आपल्या मनात तयार करतात.  भीष्म जिवंत असेपर्यंत शस्त्र हाती न धरण्याची करण्याची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म मरणारच….  कौरवांचा पराभव होणारच….  याचे गृहीतक होते का?  “दर्जाने समान प्रतिस्पर्ध्यांशीच राजकुमार युद्ध करतात”  असे स्पर्धा प्रसंगी ठणकवणारे  कृपाचार्य, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी गप्प का होते? सत्तेवरून कौरवांनी मध्ये ते शंभर असूनही दुही माजत नाही,  मात्र केवळ पाचच पांडवांना एकत्र ठेवायला एकाच द्रौपदीशी विवाह करावा लागतो, तो का ?  याच  द्रौपदीच्या विवाहाच्या वेळी व्यास येऊन द्रुपदाला, द्रौपदीच्या पूर्वजन्माची व शंकराच्या पाच पतीच्या वरांची गोष्ट का सांगतात? या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला मनामध्ये होत राहतो.

 

व्यास मात्र हे सर्व करून, कथानकात असून, स्वतः निर्विकार राहतात.  व्यासोत्तर काळात संपूर्ण संस्कृतीच कृष्णा च्या प्रेमात पडली व या अवतारवादाने महाभारतात हवी तशी भर घालून, त्याचं अगदी अंकोर वाटच्या मंदिरासारखं करून टाकले आहे.  त्याला जंगलानी  व वृक्षराजीने पूर्णपणे वेढून टाकले इतकं, की कधी कधी ते आतलं मंदिर ढळू नये म्हणून वाढलेल्या वृक्षांच्या शाखादेखील तोडता येत नाहीत, कारण तसं झालं तर, झाडांच्या मुळासह  मंदिराच्या ढाच्याला देखील धक्का लागू शकतो हि  जोतेगावकरांची हे समजावण्याची पद्धत पण अफलातून.

पण हे असं असलं तरी हे पुस्तक वाचणं सोपं नाही.  महाभारतातले बरेचसे प्रसंग आरशात दाखवताना जातेगावकर गुढात  बोलतात.  अगदी या अंकोर वाटच्या मंदिरा सारख्या.  व म्हणूनच महाभारतातले बरेचसे प्रसंग यात सांगितले असले, तरी त्याचं मर्म समजायला आपल्याला ही गूढं सोडवावी लागतात व त्या पद्धतीत जातेगावकर व्यासांचा वारसा चालवीत आहेत असे मानता येते.

More info →
Buy from Amazon
कृष्णाख्यान – महामानव कृष्णाचं चरित्र

कृष्णाख्यान – महामानव कृष्णाचं चरित्र

Rs 350eBook: Rs 220

भारतीय मनावर श्रीकृष्ण या नावाची मोहिनी गेली किमान पाच सहस्रके कायम आहे. प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी या सर्वांचे भारावलेपण हा त्यातील सामायिक दुवा आहे. कुणी त्याची भक्ती करते, तर कुणी त्यात राजकारणधुरंधर व्यक्तिमत्त्व शोधते. त्याच्या कार्याचा आवाका, त्याची निर्णयक्षमता इतकी विलक्षण आहे की, आपण चकित झाल्याशिवाय रहात नाही. आणि मग आज पाच हजार वर्षांनंतर जर आपली ही परिस्थिती असेल तर ज्या काळात तो जगला तो व त्याच्यानंतर लगतचा काळ यात तो दंतकथा बनून राहिला नसता तरच नवल.

त्याच्या कार्यकर्तृत्वावर चमत्कारांची आवरणे चढत गेली. वास्तविक पाहता त्याच्या कार्याला यातील कोणत्याही आवरणाची आवश्यकता नाही असे त्याचे कर्तृत्व निर्विवाद होते. भौतिक नियमांच्या चौकटीतच राहून त्याने त्याची अचाट कार्ये केली अन् त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्तगणांनी त्याला ‘भगवंत बनविण्यासाठी’ ही भौतिक नियमांची आणि तर्कवादाची चौकट मोडून टाकली आणि त्याच्याकडून त्याने कदाचित कधीही न केलेली अचाट कामेदेखील करून घेतली!
कृष्णाख्यान कशासाठी ?

  • कृष्णाचे मानवी रूप समजून घेण्यासाठी.
  • चमत्कार विरहीत कृष्ण समजून घेण्यासाठी, कृष्ण चरित्रातील चमत्कारांची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी.
  • मानवी पातळीवर महाभारत कसे घडले असेल हे कृष्ण-चरित्राद्वारे समजावून घेण्यासाठी.
  • कृष्ण किती वर्षे जगला? त्याच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षी घडल्या? या प्रश्नांची उत्तरे सप्रमाण मिळविण्यासाठी.
  • कृष्णाचे संपूर्ण चरित्र समजून घेण्यासाठी.

गेल्या पन्नास-साठ वर्षात अनेक नामवंतांनी कृष्णाचे हे भौतिक नियमांच्या चौकटीतील रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचताना मला यात पूर्णत्व आणण्यासाठी एका सलग, तरीपण संक्षिप्त कृष्ण-चरित्राची निकड भासू लागली. आणि म्हणूनच विविध ठिकाणी वाचलेल्या बारीकसारीक घटना, त्यामागचे तर्क, विचारमंथने मी सलग मांडून शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे. कृष्णाचे खरेखुरे स्वरूप जाणून घ्यायची माझ्यासारखी जिज्ञासा असणाऱ्या वाचकांना माझे हे ‘कृष्णाख्यान’ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

More info →
हा जय नावाचा इतिहास आहे

हा जय नावाचा इतिहास आहे

पुस्तकाच्या नावावरून हे थोडक्यात वर्णिलेले महाभारत असावं असं मला वाटलं होतं.  प्रकरणांची नावे त्यांच्या संस्कृत श्लोकांची संक्षिप्त मराठी अर्थ आहे.  पण श्री आनंद साधले यांनी , वेचून वेचून युधिष्ठिराला नाव ठेवणारे श्लोक कसे निवडले असावेत?  याचं आश्चर्य वाटत राहतं.  श्रीकृष्णाचे मजबूत अधिष्ठान हे देखील या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.  पांडवांची वैगुण्य दाखवत ती श्रीकृष्णाने कशी झाकली,  हे दाखवत साधले यांनी श्रीकृष्णाचे गुणगान  केलं आहे.  आणि प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्ण नसता तर काहीच कसं  होऊ शकलं नसतं,  हे दाखवत त्यांनी अर्जुना सह सर्व पांडव कसे प्रभावहीन ठरत हे रंगविले आहे.

आणि हे करताना धृतराष्ट्र, दुर्योधन प्रभृतींचा त्रागा कसा समर्पक होता व त्यांचाच राज्यावर कसा प्रथम अधिकार ठरत होता हेदेखील त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यात कर्णावर वेळोवेळी झालेला अन्याय त्यांनी अधोरेखित करत कर्णाच्या पराभवांवर  व चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

पण असे असले तरी १९६४ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे हे पुस्तक महाभारताविषयी चा एक वेगळा व कदाचित विद्रोही दृष्टिकोण म्हणून अभ्यासायला हवे.  तसे झाले तरच  अभ्यासकांकडून त्यातील सत्याच्या खोलात जाण्याचे प्रयत्न होतील.  मात्र असे प्रयत्न न झाल्यास तो वाचक अभ्यासाच्या पातळीवर न जाता अगम्य महाभारतात हरवून जाईल.

छोटी छोटी प्रकरणं, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  लेखक यातून तो तो प्रसंग रंगवत वाचकाच्या मनावर ठसवत जातो.  ही एक चांगली लेखन पद्धत आहे पण केवळ युधिष्ठिराची वैगुण्ये दाखवण्याच्या अट्टाहासापायी  हे वैशिष्ट्य वाया गेले असे वाटत राहते.

More info →
Buy from GoodReads
Buy from Amazon
व्यासांचे शिल्प – नरहर कुरुंदकर

व्यासांचे शिल्प – नरहर कुरुंदकर

Rs 299

महाभारतामध्ये प्रत्येक शतकात काहीना काही भर पडत गेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असणारी महाभारताची प्रत म्हणजे 'नीलकंठी प्रत'. परंतु ही काही मूळ महाभारताची प्रत नाही याची सर्वांना जाणीव होती. निळकंठी प्रतीच्या जास्तीत जास्त मागे जाण्याचे उद्देशाने पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमार्फत कै डॉ सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२७ साली विद्वानांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ही आवृत्ती तयार करण्यासाठी तेलुगू मधील आंध्र महाभारत, जावा येथील महाभारत, काश्मीर मधील शारदा प्रत, महाभारतावरील सर्वात जुनी टीका लिहिणारा देवबोध, महाभारत सारांश सांगणारा क्षेमेंद्र  याची 'भारतमंजिरी' अशा अनेक प्रतींचा अभ्यास करण्यात आला. शेवटी १९६६ साली महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार झाली. याला 'भांडारकर प्रत' असे म्हणतात. कुरुंदकर ही चिकित्सक आवृत्ती इस १००० च्या सुमाराची मानतात.

More info →
Buy from Amazon