व्यासांचे शिल्प – नरहर कुरुंदकर
महाभारतामध्ये प्रत्येक शतकात काहीना काही भर पडत गेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असणारी महाभारताची प्रत म्हणजे 'नीलकंठी प्रत'. परंतु ही काही मूळ महाभारताची प्रत नाही याची सर्वांना जाणीव होती. निळकंठी प्रतीच्या जास्तीत जास्त मागे जाण्याचे उद्देशाने पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमार्फत कै डॉ सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२७ साली विद्वानांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ही आवृत्ती तयार करण्यासाठी तेलुगू मधील आंध्र महाभारत, जावा येथील महाभारत, काश्मीर मधील शारदा प्रत, महाभारतावरील सर्वात जुनी टीका लिहिणारा देवबोध, महाभारत सारांश सांगणारा क्षेमेंद्र याची 'भारतमंजिरी' अशा अनेक प्रतींचा अभ्यास करण्यात आला. शेवटी १९६६ साली महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार झाली. याला 'भांडारकर प्रत' असे म्हणतात. कुरुंदकर ही चिकित्सक आवृत्ती इस १००० च्या सुमाराची मानतात.
More info →

