
Sri Ekambareswarar Temple of Kanchipuram is one of the famous temples of Kanchipuram wherein Shiva is worshipped in the form of Earth Linga, a Lingam made out of River Sand. This temple has a 192 feet high Gopuram which is amongst the largest of South Indian Temples. The Temple derives its names from One Mango Tree in it, and hence Shiv here is known as Ekambaranatha.
In Hinduism, the Sapta Puri, or seven holy cities, are Ayodhya, Mathura, Maya (Haridwar), Kasi (Varanasi), Kanchi (Kanchipuram), Avantika (Ujjain), and Dvaravati (Dwarka). These cities are considered to be the holiest Hindu Teerths, and each city has a strong connection with Hindu deities.
Shiva in Kanchipuram worshipped as Ekambareswarar or Ekambaranathar or Rajlingeswaram, and is represented by the lingam as Prithvi lingam while Parvati is depicted as Elavarkuzhali or Kamakshi Amman.
कांचीपुरम ही दक्षिणेतील मंदिरांची नगरी. व म्हणूनच हिंदू धर्मातील पवित्र सप्त पुरींपैकी एक. अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, काञ्चीपुरम, अवन्तिका (उज्जैन), द्वारिकापुरी ही ती सात पुण्य नगरे. याच कांचीपुरम नगरीत कैलासनाथार चे सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे तसेच एकांबरेश्वराचे देखील. या मंदिरातील शिव वालुकामय शिवलिंगाच्या स्वरूपात असून ११ टप्पे असलेले १९२ फूट उंचीचे येथील गोपुर हेदेखील दक्षिणेकडील मंदिरांच्या उंच गोपुरांपैकी एक आहे.
मंदिराची कथा

या मंदिराच्या कथेशी पार्वती जोडलेली आहे. एकदा शंकर विश्वाच्या रचना प्रक्रियेत गुंतले असताना पार्वतीने मधेच येऊन लाडिकपणे त्यांचे डोळे झाकले. पण यामुळे त्यांच्या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे शंकर संतापले आणि त्यांनी पार्वतीला आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर पाठवून दिले. पार्वती पृथ्वीवर आली ती थेट या कांचीपुरम मध्ये कंबा अथवा वेगवती नदीच्या काठावर. तिथे तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी वाळूचे शिवलिंग बनवून एका आंब्याच्या झाडाखाली तप सुरु केले. शिवाने या तपाचरणाची परीक्षा पाहण्याकरिता अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला पण पार्वती या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली. यात शिवाने तिच्यावर अग्नी पाठवला तेव्हा पार्वतीने आपल्या बंधूंची, विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने या अग्नीला शीतल करण्याकरिता चंद्राची योजना केली व त्याच्या किरणांनी झाड आणि पार्वतीला देखील थंड केले.

त्यानंतर पार्वतीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी शिवाने आपल्या जटेतील गंगा या शिवलिंगाला वाहून नेण्यासाठी सोडली तेव्हा पार्वतीने गंगेला पटवून दिले की, त्या बहिणी असल्याने तिने पार्वतीला इजा करू नये. तसेच तिने या शिवलिंगाला मिठी मारली आणि आपल्या छातीशी ते कवळून धरले आणि गंगेचा स्पर्श त्याला होऊ दिला नाही. मग पार्वतीवर प्रसन्न होऊन याच आंब्याच्या झाडाखाली पुढे शिवाने पार्वतीचा स्वीकार केला व म्हणून तो एकांबरेश्वर बनून तिथेच राहिला.
दुसऱ्या एका कथेनुसार शिव व पार्वती फाशांचा खेळ खेळत असताना त्यांच्यात काही वाद झाला व शंकराने तिला कुरूप होण्याचा शाप दिला. त्यामुळे या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी पार्वती कांची येथे आली व येथे तिने तप केले आणि या ठिकाणच्या आंब्याच्या झाडाखाली त्यांचे पुनर्मिलन झाले म्हणून तो “एक-आम्र-नाथ” किंवा “एकाम्बरनाथ” आणि तपश्चर्येने रूपवान झालेली पार्वती म्हणजेच कामाक्षी. या कामाक्षी देवीचे मंदिर येथून जवळच असून ते कामाक्षी अम्मन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवकथेतील हा भाग दर्शविणाऱ्या कथा या एकांबरेश्वर मंदिरातील व तसेच कामाक्षी अम्मन मंदिरातील अनेक खांबांवर कोरलेल्या आहेत. त्या पाहून, त्यामागची कथा जणू घेणे उत्कंठावर्धक ठरते. या मंदिरातच ते आंब्याचे झाड अजूनही दाखविले जाते व या झाडाच्या ४ फांद्या ४ वेगवेगळ्या चवीची आम्रफले देतात असेही सांगितले जाते. या मंदिरांची परिक्रमा करताना १०८ शिवलिंगे दृष्टीस पडतात. या मंदिराच्या आवारातच शिवगंगा हा प्रशस्त तलाव देखील आहे. याचबरोबर निळकंठ पेरुमल हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशांपैकी एक असलेले मंदिर देखील येथे आहे.

पृथ्वी पंचमहाभूत मंदिर
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणेकडे जी पंचमहाभूतांची मंदिरे मानली जातात त्यापैकी हे मंदिर एक असून हे मंदिर पृथ्वीतत्वाचे समजले जाते. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश ही ५ तत्त्वे म्हणजे पंचमहाभूते. ही मंदिरे दक्षिण भारतात,म्हणजे चार तामिळनाडू राज्यात आणि एक आंध्र प्रदेशात आहेत. सर्व पाच मंदिरे 78°E आणि 79°E रेखांशाच्या आसपास आणि 10°N आणि 14°N अक्षांशांच्या दरम्यान आहेत.
या मंदिरातील शिवाची काही रूपे
एकांबरेश्वरच्या या मंदिरात शिवाच्या भिक्षाटन शिव स्वरूपाची काही शिल्पे आहेत. या शिल्पाबद्दलची अधिक माहिती आपल्याला “भिक्षाटन शिव” या लिंक वर मिळू शकेल.
या मंदिराच्या विष्णुमंदिराच्या मागच्या बाजूला लिंगोद्भव शिवाचे एक अतिशय सुंदर शिल्प आहे.
मंदिरातील काही सुंदर शिल्पे
या मंदिरांच्या अनेक खांबांवर व तसेच मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी कथाशिल्पे आहेत. हि शिल्पे ओळखून यांच्या कथा जाणून घेणे देखील एक आनंददायी अनुभव असतो. यापैकी काही शिल्पे येथे दिली आहेत. त्या छायाचित्रांवर क्लिक करून त्याविषयीची अधिक माहिती तुम्ही करून घेऊ शकता.
