Videos-कृष्णाख्यान

कृष्णाख्यान Videos in Marathi on Life Story of Krishna

This Page contains  my Videos on Krishna. These Krishnakhyan videos describe the Life of Krishna from his Birth till Death. These have been prepared as a part of Lecture series on Krishna, with reference to Mahabharat and Harivansh.  Click on the video link, to see that video from the list.

कृष्णाच्या आयुष्यावर आधारित ” कृष्णाख्यान ” या मालिकेअंतर्गत मी तयार केलेली ८ व्याख्याने येथे विडिओ च्या स्वरूपात आहेत. यात कृष्णजन्मापूर्वी पासून ते यादवी व श्रीकृष्णाच्या मृत्यू पर्यंतचे कथानक आले आहे. हे कथानक वास्तव वादी कृष्णाचे दर्शन घडविणारे असून मुख्यत्वे करून हरिवंश व महाभारतावर आधारलेले आहे.

कृष्णाख्यान – १ – कृष्णजन्मापूर्वीची परिस्थिती

कृष्ण आणि शिवराय यांच्यातील साम्यस्थळे, कृष्ण अभ्यासासाठी संदर्भ , यादवांची विविध कुळे , वर शाप आणि चमत्कारांचा अर्थ , जरासंधाचा साम्राज्यवाद कंसाचा उदय , नारद म्हणजे कोण ? याबद्दलची माहिती आपल्याला या पहिल्या सत्रात ऐकायला मिळेल.

कृष्णाख्यान -२ – कृष्णजन्म ते कंसवध

पुष्प दुसरे – नारदाची भविष्यवाणी, कृष्णजन्म, गोकुळातील बाललीला, वृंदावनात स्थलांतर का करावे लागले ? तेथील पराक्रम, मथुरेला प्रयाण, कंसवध.

कृष्णाख्यान-३ – लोकनेत्याचा उदय   

पुष्प तिसरे- लोकनेत्याचा उदय, संदिपनींकडे विद्याभ्यास, जरासंधाच्या आक्रमणांचा प्रतिकार, रुक्मिणीहरण

कृष्णाख्यान-४ – स्यमंतक मण्याचे प्रकरण ते द्रौपदी स्वयंवर

पुष्प चौथे – स्यमंतक मण्याचे प्रकरण, नरकासुर वध, द्रौपदी स्वयंवरात पांडव भेट

कृष्णाख्यान – ५ – महाभारतातील कृष्ण, द्रौपदी स्वयंवर ते जरासंध वध.

पुष्प पाचवे – द्रौपदी स्वयंवरात कृष्ण, सुभद्राहरणात अर्जुनाला मदत, खांडववन दहन, राजसूय यज्ञ प्रस्ताव, जरासंधाचा वध, ….. द्रौपदी स्वयंवरात उपस्थित असलेल्या कृष्णाने स्वयंवरात भाग का घेतला नाही?

कृष्णाख्यान-६, राजसूय यज्ञ ते कृष्ण शिष्टाईपूर्वी

पुष्प सहावे – राजसूय यज्ञातील अग्रपूजन, शिशुपाल वध, शाल्ववध, द्रौपदी वस्रहरणाच्या वेळी काय घडलं ?, मंत्रयुद्धाला सुरुवात

कृष्णाख्यान-७ : कृष्णशिष्टाई व महाभारत युद्धातील कृष्ण

पुष्प सातवे – कृष्णशिष्टाई, निवडक युद्धकथा – भगदत्त, भूरिश्रवा यांचा वध,
युधिष्ठिर-अर्जुन वादातील समेट

कृष्णाख्यान-८ – श्रीकृष्णाचा मृत्यू

पुष्प आठवे – महाभारत युद्धाच्या शेवटी…, यादवांचा विनाश व श्रीकृष्णाचा मृत्यू, श्रीकृष्णाच्या वयाचे गणित- कृष्णाच्या व अर्जुनाच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांवरुन.