
Namaste. I, Mahesh Naik, Welcome you to my pages on Mahabharat. This website not only reflects the concept of MAHA-BHARAT, signifying the GREATER BHARAT and its temples and sculptures, but also reflects my thoughts on revealing some of the hidden, lesser-known facts and secrets of Mahabharat.
A mechanical engineer by profession, I worked for Rashtriya Chemicals and Fertilizers Ltd., Mumbai, and Qatar Shell GTL for over 32 years. With my inclination towards Indian history, traveling, and astronomy, I decided to call it a day for my professional life and devote my time to traveling across the length and breadth of India as well as to studying the Mahabharat, the grandest historical epic of India and the world.
In the recent past, I studied a lot about Mahabharat, the Great Epic of Ved Vyas. That revealed a different aspect of KRISHNA to me, the outcome of which is a book on the biography of KRISHNA (named Krishnakhyan – the Story of Krishna). It has come out in Marathi and, later on, will be available in English.
In 2025 I completed my postgraduate degree in M.A. (Hindu Studies) from the University of Mumbai. In 2026, I completed a Diploma in Indian history, art, and architecture from Punyashlok Ahilyabai Holkar University of Solapur.
माझ्याबद्दल थोडेसे
नमस्कार, मी महेश नाईक, महाभारताच्या या माहितीपूर्ण वेबसाइट वर मी सर्व वाचकांचे स्वागत करतो.
मी व्यवसायाने अभियांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) असून मुंबईतील राष्ट्रीय रसायन व उर्वरक ( RCF ) या भारत सरकारच्या उपक्रमात व कतार शेल (Qatar Shell GTL) या ऊर्जा संयंत्रामध्ये मिळून सुमारे ३२ वर्षांहून अधिक काळ, अधिकारी पदावर काम केलेले आहे. भारतीय इतिहासाची आवड, देशविदेशातील भटकंती, खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. खगोल मंडळ, या मुंबईतील हौशी खगोल अभ्यासकांच्या सर्वात मोठ्या व जुन्या संस्थेचे अध्यक्षपद देखील मी ६ वर्षे भूषविले आहे.
छत्रपती शिवराय व महाभारत हे माझ्या खास आवडीचे विषय. त्याचबरोबर देश-विदेशातील भ्रमंती हा देखील माझा छंद आहे. या भ्रमंतीत मी बरीचशी हिंदू मंदिरे पाहिली आहेत, त्यातील शिल्पे अभ्यासली आहेत. त्याचबरोबर विशेषतः महाभारताच्या अभ्यासाला देखील मी वाहून घेतले आहे. महाभारत हा काल्पनिक ग्रंथ नसून तो आपला इतिहास आहे. आणि म्हणूनच त्याच्याकडे वस्तुनिष्ठ भूमिकेतून पाहायला हवे या दृष्टीकोनातून मी महाभारताचा अभ्यास करतो. त्यातून मला गवसलेले विचार माझ्या या वेबसाइटवर मांडले आहेतच. महाभारताच्या बऱ्याचश्या जुन्या नव्या पुस्तकांचा मी अभ्यास केला आहे. या पुस्तकांविषयीची माझी मते आपल्याला पुस्तक परिचय या सदरात वाचायला मिळतील.
या सर्व अभ्यासातून मला गवसला एक वेगळाच कृष्ण. त्या कृष्णाची ओळख सर्वाना करून देता यावी याकरिता मी नुकतेच कृष्णाख्यान नावाचे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. जुलै २०२२ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकाच्या खरेदीच्या लिंक या वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
२०२५ मध्ये मी मुंबई विद्यापीठातून हिंदू स्टडीज (M.A. – Hindu Studies) चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला तर २०२६ च्या सुरवातीला सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठातून भारतीय इतिहास, कला व स्थापत्य या विषयातील पदविका प्राप्त केली. हे करताना ज्या काही विषयांचा अभ्यास केला त्यावर काही लेख या वेबसाईट वर आढळून येतील.
गेले ३ – ४ वर्षे भारतातील अनेक प्राचीन मंदिरे नजरेखालून खटले आणि जमेल तसा त्यांचा परिचय इतरांना करून देत गेलो, त्याचाच एक भाग म्हणजे ही वेबसाईट.
